ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी दरडी काढण्याचं काम सुरु आहे. दरडी काढण्याचं हे काम अंतिम टप्प्यात आल असून, पुढील काही दिवस ठराविक वेळेत मुंबईच्या दिशेने जाणारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक बंद राहू शकते.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्ताननुसार २२ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान एक्सप्रेस वे वर वाहनांची वदर्ळ कमी असताना वाहतूक बंद ठेऊन दरडी काढण्याचं काम करण्यात येणार आहे. खंडाळा घाटात दरडी काढण्याचं काम सुरु असून, धोकादायक दरडी हटवल्यानंतर तिथे जाळी बसवण्यात येईल.
दिवसा वाहतूक सुरु ठेऊन रात्रीच्या वेळी काम करण्यात येईल. दिवसा गरज भासल्यास वाहतूक बंद ठेवली जाईल असे आयआरबी आणि वाहतुक पोलिसांनी सांगितले. मागच्या काही वर्षात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन जाणा-या गाडयांवर धोकादायक दरडी कोसळून अनेकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले आहेत.