पुणे: पुणे-मुंबई दरम्यान हायपलूप या नवीन प्रकाराच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन ’या कंपनीच्या पदाधिका-यांनी प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.कंपनीकडून पुढील सहा महिन्यात या संदर्भातील व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएमार्फत शासनास सादर केला जाणार आहे. शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे - मुंबई हायपरलूप संदर्भात सामंजस्य करार झाला आहे. हायरपरलूप कंपनीकडून पुणे-मुंबई मार्गाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएला सादर करण्यात आला. आता अतिजलद वाहतुकीची सुविधा देणा-या या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनीकडून संयुक्तपणे हा अहवाल केला जात आहे.त्याचा सर्व खर्च हायपरलूपकडून करणार आहे. मुंबई आणि पुणे विभागांतील महानगर प्रदेशांना हायपरलूप तंत्रज्ञानाने जोडल्यास २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र,त्याची व्यवहार्यता तपासून मगच हा प्रकल्प करण्यात येणार आहे.किरण गित्ते म्हणाले, हायपरलूपसाठी आवश्यक परवानग्या, त्यासाठी लागणारी जमीन,अभियांत्रिकी आव्हाने याबाबतची पाहणी ‘हायपरलूप वन’च्या पदाधिका-यांकडून सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीचे पदाधिकारी मुंबईत आहेत. मंगळवारी कंपनीच्या पदाधिका-यांनी प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.पुढील सहा महिन्यात त्यांच्याकडून यावरील व्यवहार्यता अभ्यास अहवाल प्राप्त होईल. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल.शासनाकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल.
मुंबई-पुणे मार्गाची ‘हायपरलूप वन’ कडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 8:15 PM
शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे - मुंबई हायपरलूप संदर्भात सामंजस्य करार झाला आहे
ठळक मुद्देपीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनीकडून संयुक्तपणे हा अहवाल जलद वाहतुकीची सुविधा देणा-या या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू