पुणे : मुंबई ते सोलापूर एक्सप्रेस ही सप्ताहातून ६ दिवस चालणारी रेल्वे गाडी आता गदगपर्यंत धावणार आहे़.तसेच या गाडीचा नंबरही बदलण्यात आला आहे़. त्याचवेळी सोलापूर -विजापूर -सोलापूर ही सप्ताहातून दोन दिवस धावणारी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे़. मुंबई ते सोलापूर (२२१३९/२२१४०) एक्सप्रेसचा नंबर आता १११३९/१११४०) हा राहणार आहे़ .छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून ही एक्सप्रेस (गुरुवार वगळता) १६ मे २०१८ पासून दररोज रात्री २१़.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी गदगला पोहचेल . गदगहून ही गाडी १७ मे २०१८ पासून दररोज (शुक्रवार वगळता) दुपारी १३़.४० वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ५़.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचणार आहे़ . ही गाडी दादर, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, कुर्डवाडी, सोलापूर, विजयपुरा आणि बागलकोटला थांबेल़. या गाडीला १ वातानुकुलित प्रथम श्रेणी २ टीयर, २ वातानुकुलित ३ टीयर, ४ शयनयान, ५ सामान्य व्दितीय श्रेणीचे डबे असतील़. या गाडीचे आरक्षण १५ मार्चपासून सर्व आरक्षण केंद्रांवर व वेबसाईटवर १२० दिवस अगोदर सुरु होत आहे़. ़़़़़़़़* मुंबई - गदग ही एक्सप्रेस गाडी मुंबई ते सोलापूर दरम्यान सुपरफास्ट असणार .* सोलापूर -विजापूर -सोलापूर ही गाडी १० मार्चपासून रद्द
मुंबई -सोलापूर एक्सप्रेस आता गदगपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:46 PM
मुंबई ते सोलापूर एक्सप्रेस ही सप्ताहातून ६ दिवस चालणारी रेल्वे गाडी आता गदगपर्यंत धावणार आहे़.
ठळक मुद्दे* मुंबई - गदग ही एक्सप्रेस गाडी मुंबई ते सोलापूर दरम्यान सुपरफास्ट असणार .* सोलापूर -विजापूर -सोलापूर ही गाडी १० मार्चपासून रद्द