पुणे: महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस, बी.एड अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. परंतु, शहरातील ३३ अभ्यासिका सध्या बंद असून, मार्गदर्शक मिळत नसल्याने या अभ्यासिकांना कुलूप लावण्यात आल्याचे समाज विकास अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या कारभारामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गरीब व मागासवर्गीय ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने अभ्यासिका चालविल्या जातात. शहरातील वस्तीपातळीवरील समाजमंदिरे, महापालिकेच्या शाळांचे हॉल,वर्ग खोल्या अभ्यासिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय महापालिकेच्या वतीने शहरामध्ये १४२ ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर अभ्यासिका वर्ग घेण्यात येतात.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मासिक मानधनावर डी.एस, बी.एड अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. सध्या केवळ १०९ अभ्यासिका सुरु आहेत. मात्र ,केवळ पात्र मार्गदर्शक मिळत नसल्याने शहरातील ३३ अभ्यासिकांना कुलूप लावल्या प्रकार समोर आले आहे. याबाबत नगरसेविका पल्लवी जावळे यांनी याबाबत लेखी प्रश्न विचारले होते. यावर प्रशासनाने उत्तर दिले असून,यामध्ये ही माहिती समोर आली आहे. वस्तीपातळीवर घरातली वातावरणामुळे अभ्यासासाठी अनेक अडचणी येतात. हुशार व होतकरु विद्यार्थ्यांची केवळ अभ्यासासाठी जागा नसल्याने अडचण होते. या गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मासागवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शहराच्या विविध भागाता कोट्यवधी रुपये खर्च करून अभ्यासिका बांधल्या आहेत. परंतु,सध्या ऐन परीक्षांच्या हंगामात या अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 7:55 PM
शहरातील वस्तीपातळीवरील समाजमंदिरे, महापालिकेच्या शाळांचे हॉल,वर्ग खोल्या अभ्यासिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय महापालिकेच्या वतीने शहरामध्ये १४२ ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देशहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय शहरातील गरीब व मागासवर्गीय ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने अभ्यासिका चालविल्या जातात.