पुणे : कोरोना काळात सर्वाधिक मागणी असलेली कार्डिअॅक रुग्णवाहिका पालिकेकडे नव्हती. पालिकेने ही रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी (दि. १५) मान्यता दिली.
समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले की, डी-टाईप अत्याधुनिक वैद्यकीय साहित्यासह फॅब्रिकेशन असलेली कार्डिअॅक रुग्णवाहिका खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. जीएसटी, वाहतूक, आरटीओ नोंदणी, फॅब्रिकेशन व सुसज्ज वैद्यकीय उपकरणांच्या खर्चासह ६४ लाख ८२ हजार ६७१ रुपयांना ही रुग्णवाहिका खरेदी केली जाणार आहे. या खरेदीस स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
===
पालिकेत पदभरती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या ३९ नागरी सुविधा केंद्रांमध्ये अकरा महिन्याच्या करारावर १०० पदे भरण्यास स्थायी समितीने मंजूरी दिली. या केंद्रामार्फत मिळकतकर भरणा, मिळकतकर दाखले, जन्म-मृत्यू दाखले, नळजोडणी आणि मीटर जोडणी संबंधी कामे, आरोग्य खात्याशी संबंधित नर्सिंग होम, रुग्णालये यांचे परवाने, विविध खात्यांचे ना-हरकत दाखले आदी सेवा दिल्या जातात.