शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

By admin | Published: March 18, 2017 5:01 AM

शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेतील पाणी साठवण टाक्यांच्या चौकशीवरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये नवे

पुणे : शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेतील पाणी साठवण टाक्यांच्या चौकशीवरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच जोरदार जुंपली आहे. सत्ताधारी भाजपाने ही चौकशी आयुक्त करतील, असे जाहीर केले तर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. चौकशीचा फार्स करू नका, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.आमदारांच्या मागण्यांची दखल घेत तब्बल तीन महिन्यांच्या विलंब करीत सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेला या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी ही चौकशी आयुक्त करतील, असे शुक्रवारी जाहीर केले.विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने याला हरकत घेत ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी लगेचच केली. तसे पत्र त्यांनी महापौर टिळक यांनाही दिले व मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठवले. फेरफार केल्याचा आरोप आयुक्तांवर होतच आहे व त्यांनाच चौकशी करायला सांगणे म्हणजे चौकशीचा केवळ फार्स करणे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे व शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, बाळा ओसवाल यांनी केली.महापौर टिळक यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की निविदा प्रक्रिया प्रशासनामार्फत राबविण्यात आली होती. आयुक्तांनी त्याची चौकशी करण्यात काहीही गैर नाही. येत्या दोन दिवसांत सर्व अहवाल राज्य सरकारला पाठवला जाईल. पुणेकरांना २४ तास पाणी देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. अहवाल राज्य सरकारला दिल्यानंतर त्यांचा निर्णय येईपर्यंत टाक्यांचे काम सुरू केले जाणार नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)निविदा प्रक्रियेत फेरफारीचा आरोपराज्य सरकारच्या नगरविकास विभागाने या टाक्यांच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. विधान परिषदेतील चर्चेत आमदार अनिल भोसले व अनंत गाडगीळ यांनी तशी मागणी केली होती. निविदा प्रक्रियेत फेरफार केला असल्याचा संशय यात व्यक्त केला जात आहे. एकाच कंपनीला काम मिळावे यासाठी पूर्वी जाहीर केलेली निविदा बदलून नव्या अटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असा प्रकार यात झाला असल्याची चर्चा आहे.