पुणे: कोरोनाचे प्रमाण वाढले असताना पुणे महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. आणि राज्य शासनाला वारंवार नावे ठेऊन स्वत:चा नाकर्तेपणा लपवत आहे असा आरोप पर्वती शिवसेना संघाने करतानाच महापालिकेने आता जो नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे तो थांबवावा आणि कोरोना रुग्णांना सक्षम उपचार यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
पुण्यात शिवसेना पर्वती मतदार संघाच्यावतीने विभागप्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपशहरप्रमुख बाळासाहेब ओसवाल, भरत आबा कुंभारकर याांनी पुणे महानगरपालिकेच्या निषेधार्ह आंदोलन केेेले. यावेळी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेना आंदोलकर्ते म्हणाले, पुण्यातील नागरिकांना आरोग्य सेवा व ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू नसल्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांना जीव गमवावा लागत आहेत. आता तरी महानगरपालिकेने जनतेच्या जीवाशी जो खेळणे थांबवावे आणि तातडीने आरोग्य यंत्रणेला सूचना देत ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून द्यावे. तसेच क्वारंटाइन सेंटर सुरू करावे.
या आंदोलनावेळी राजाभाऊ भिलारे, किशोर रजपूत, मुकेश पोटे, तानाजी लोहकरे, नरेंद्र गंजे, अजय कुडले, सचिन माचेकर, गोपी ठोंबरे, विश्वनाथ कुंभार, अभिजित दहिवले, सौरभ जगताप उपस्थित होते.