पिंपरी : महापालिकेने सारथी हेल्पलाइन पाठोपाठ नागरिकांशी आॅनलाइन संवाद साधण्यासाठी फेसबूक पेज सुरू केले. ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी पेजचे अनावरण झाले, तेव्हापासून अद्यापपर्यंत ५७०२ लाईक्स मिळाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात महापालिकेने राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. महापालिकेतील विविध विभागांशी संबंधित कामांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेने १५ आॅगस्टला सारथी हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. मिळकत करभरणा, एलबीटी, बांधकाम परवाना, नळजोड तसेच विविध प्रकारचे दाखले, ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा? कोठे संपर्क साधायचा? प्रक्रिया कशी असते? याची माहिती सारथी हेल्पलाइनवर दिली जात होती. आता सारथी हेल्पलाइन उपक्रमाचा प्रतिसाद थंडावला आहे. महापालिकेने फेसबूक पेज सुरू करून आॅनलाइन संपर्काची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
महापालिका फेसबूक पेजला ५७०२ लाईक्स
By admin | Published: June 15, 2014 4:25 AM