पुणे : बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोपमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी महापालिकेच्यावतीने अतिक्रमण विरोधी कारवाई करून तो भाग अतिक्रमणमुक्त करण्यात आला़
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कोरोना आपत्तीच्या काळात अनधिकृत बांधकामे व गोडाऊनवर कारवाई केली नव्हती़ परंतु, या काळात अनेक भागांमध्ये हिलटॉप व हिलस्लोप भागात मोठ्या प्रमाणात पत्र्याचे शेड असलेले गोडाऊन तसेच कच्ची बांधकामे उभी राहिली़ यामुळे महापालिकेकडून पुन्हा अशा बांधकामांना नोटिसा पाठवून ती हटविण्याबाबतची सूचना देण्यात आली़ मात्र यास अतिक्रमणकर्त्यांनी दाद दिली नाही़ अखेरीस आज महापालिकेने बिबवेवाडीपासून या कारवाईला सुरूवात केली आहे़ यामध्ये बिबवेवाडी येथील सर्व्हे नंबर ६२७ मधील १६ व्यापारी गोडाऊनवर कारवाई करून सुमारे ५० हजार चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले़ कार्यकारी अभियंता हर्षदा शिंदे, उपअभियंता रमेश काकडे, रणजित मुटकुठे आदींच्या टिमने ही कारवाई केली़
-------------------
फोटो मेल केला आहे़