शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

महापालिकेची रुग्णालये आजारी

By admin | Published: August 30, 2016 1:05 AM

महापालिकेच्या शासकीय रुग्णालयातील मनमानी कारभारामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पिंपळे गुरव : महापालिकेच्या शासकीय रुग्णालयातील मनमानी कारभारामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव, डॉक्टरांची संख्या अपुरी यांसारख्या कारणांमुळे रुग्णालयच आजारी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या गोष्टीस रुग्णालयाची कुचकामी यंत्रणा जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरूआहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालये निर्माण केली जातात. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. जुनी सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय व पिंपळे गुरव येथील सौ. शेवंतीबाई सहादू काशिद रुग्णालय आहे. इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ओपीडी, महिला प्रसूतिगृह आदी रुग्णांवर उपचार केले जातात. तर काशिद रुग्णालयात ओपीडी, क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण, लहान बालकांना दर गुरुवारी लसीकरण केले जाते. रुग्णालयामध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात किंवा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवावे लागते. अशा विविध किरकोळ कामासाठी रुग्णांना व नातेवाइकांना दुसऱ्या दवाखान्यात खेटे मारावे लागतात. दंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, डॉक्टरांची अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत अनेक वेळा तक्रकारी करूनही प्रशासनाकडून दाद दिली जात नाही. लोकसंख्येच्या तुलनेत येथील महापालिकेचा सौ. शेवंतीबाई सहादू काशिद दवाखाना हा दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे प्रसूतीच्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना पायऱ्या चढणे आणि उतरणे मोठे जिकिरीचे बनले आहे. दोनच खोल्यांमध्ये हजारो रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे स्वतंत्र अंतररुग्ण विभाग सुरू करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे. रुग्णालयाची इमारत सुसज्ज आहे. मात्र, आणखी खोल्यांची आवश्यकता आहे. रुग्णालयात फक्त बाह्यरुग्ण विभाग आहे. रुग्णालयात थंडी, ताप, सर्दी, टीबी आदी आजारांचे ६० ते ७० रुग्ण रुग्णालयात दररोज उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, ओपीडीची वेळ सकाळी ८ ते १२ असल्यामुळे ही वेळ कमी असल्यामुळे बहुतांश रुग्णांना सकाळी सर्व कामे उरकून रांगेत उभे राहावे लागते. गर्दीच्या दिवशी ही रांग जिन्यामध्ये पोहचते. दुसऱ्या मजल्यावर दवाखाना असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व प्रसूतीच्या महिलांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. त्यातच प्रसूतीच्या महिलांना पुढील उपचारासाठी सांगवी येथील इंदिरा गांधी दवाखाना किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते. या रुग्णालयात महिलांना तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश महिला या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागते. रांगेत उभे राहून जास्तीचा त्रास सहन करावा लागतो आहे. ही गर्दी होत असल्यामुळे लहान मुलांना रांगेत थांबवावे लागते. लोकसंख्येच्या मानाने या ठिकाणी महिला प्रसूतीसाठी स्वतंत्र विभाग, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, स्वतंत्र ड्रेसिंग रूम, स्वतंत्र रुग्णवाहिका आदींचे स्वतंत्र विभाग सुरू करण्याची मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)