शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पालिका प्रयोगशाळा मदतनीस वर्ग ३ वरून आले वर्ग ४ वर !

By admin | Published: February 20, 2016 1:09 AM

शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा मदतनिसाचे पद तृतीय श्रेणीतून एकदम चतुर्थ श्रेणीत आणण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे

पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमधील प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा मदतनिसाचे पद तृतीय श्रेणीतून एकदम चतुर्थ श्रेणीत आणण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे. शिक्षण मंडळ, महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार दाद मागूनही या कर्मचाऱ्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही. वेतनात घट होण्यापेक्षाही पदाची अप्रतिष्ठा होत असल्याचा त्रास या पदावर सध्या काम करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.महापालिकेने १ आॅगस्ट २००९ ला प्रयोगशाळा मदतनीस-वर्ग ३ या पदासाठीची जाहिरात दिली. त्यात शैक्षणिक पात्रता शास्त्र विषयासह माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण अशी होती. उमेदवारांची लेखी परीक्षा १९ जून २०११ रोजी झाली. त्यातून निवड केलेल्यांना वैद्यकीय परीक्षेसाठी ९ डिसेंबर २०१२ ला बोलावण्यात आले. त्यात निवड झालेल्यांना १७ डिसेंबर २०११ ला नियुक्तीचे पत्र देण्यात आले. तेव्हापासून हे सर्व जण शिक्षण मंडळात प्रयोगशाळा मदतनीस-वर्ग ३ या पदावर सन २०१४पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर अचानक फेब्रुवारी २०१४ मध्ये शिक्षण मंडळ, माध्यमिक व तांत्रिक विभागाकडून पालिकेच्या उपायुक्त- सेवक वर्ग यांना एक पत्र पाठवण्यात आले. त्यात प्रयोगशाळा मदतनीस-वर्ग ३ या पदावर काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पद प्रयोगशाळा परिचारक-वर्ग ४ करण्यात यावे असे नमूद करण्यात आले होते. या पत्राचा आधार घेत पालिका प्रशासनानेही सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनपावती तसेच सेवा पुस्तकात तशी दुरुस्ती केली. त्याचा धक्का बसून या कर्मचाऱ्यांनी २० एप्रिल २०१५ रोजी प्रशासनाला पत्र देऊन आपली नाराजी व्यक्त केली व आपल्याला सेवेत घेतले त्याच पदावर ठेवावे अशी विनंती केली. प्रशासनाने त्याची दखलही घेतली नाही. वर्ग ३ व वर्ग ४ या दोन्ही पदांच्या वेतनश्रेणीत तर फरक आहेच शिवाय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्येही बराच फरक आहे. वर्ग ४ पदावर काम करणारे जर स्वच्छता कर्मचारी असतील व त्यांना घाण भत्ता (कचऱ्यात काम करीत असल्यामुळे) मिळत असेल तर निवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना पालिका सेवेत घ्यावे लागते.