शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

महापालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 9:50 PM

शहरामध्ये दर वर्षी सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. यात तब्बल ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात.

ठळक मुद्दे२१० ठिकाणी विसर्जन हौद:  ४१ ठिकाणी निर्माल्य कलश तर ३९६ मोबाईल टॉयलेट महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गांवांमध्ये गणेशोत्सवासाठी स्वतंत्र सोय

पुणे: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. यामध्ये विर्सजन हौद, मोबाईल टॉयलेटची सुविधा, अमोनियम बायर्कोनेटची खरेदी, निर्माल्य कलश खरेदी आदी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.याबाबत महापालिकेचे घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले की, शहरामध्ये दर वर्षी सुमारे सहा लाख पेक्षा अधिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. यात तब्बल ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या रासायनिक द्रव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होते. यामुळे महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सल्ल्यानुसार या मूर्त्यांचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी बायकार्बोनेटची पावडर खरेदी करून नागरिकांना मोफत वाटप करण्यात येत आहे. यंदा देखील तब्बल शंभर मे.टन अमोनियम बायकार्बोनेटची खरेदी करण्यात आली आहे.     शहरामध्ये २१० ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये २२ ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कॅनॉल येथे हौद बांधण्यात आले, तर ८२ ठिकाणी लोखंडी टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक्ष क्षेत्रिय कार्यालयात ३ या प्रमाणे शहरात ४१ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने शहरात ३६ ठिकाणी ११ दिवसांसाठी एकूण ३९६ ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.     ------------प्लॅस्टिकवर कारवाईशहरात २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी वापरावर पूर्णपणे बंदी आहे. यामुळे गणेशोत्सवात प्लॅस्टिक वापरणा-यावर कडक कारवाई करण्यात आली येणार आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.----------------समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र सोयमहापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गांवांमध्ये गणेशोत्सवासाठी स्वतंत्र सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ११ गावांमध्ये ३३ ठिकाणी विसर्जनाची सुविधा, अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप, निर्माल कलश, मोबाईल टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका