पुणे : टोकियो आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील तसेच देशातील खेळाडूंना उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देण्याकरिता, शहरात पुणे महापालिकेतर्फे फोटो पॉईंट्स तयार करण्यात येणार असून याचे उद्घाटन बुधवारी सणस मैदान येथे माजी क्रीडामंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते झाले़
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, माजी आॅलिम्पियन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या माजी कबड्डी खेळाडू शकुंतला खटावकर उपस्थित होते़
कोविड महामारीच्या आपत्ती काळात खेळाडूंनी कष्टाने सराव केला आहे. या कष्टाचे फळ त्यांना नक्की मिळेल. आॅलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा समितीचा फोटो पॉईंट्स उभारणीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आशिष शेलार यांनी केले़
यावर्षी आॅलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना होणार असल्याने त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय सर्वोच्च कामगिरी करण्याचे अवघड आव्हान सर्व खेळाडूंसमोर आहे. ही आव्हाने पार करून आपले खेळाडू यशाची पताका नक्की फडकवतील असा विश्वास यावेळी महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला. तर आपल्या भारतीय संघातील खेळाडूंना शुभेच्छा देता याव्यात, यासाठी पुणेकरांकरिता काही महत्वाच्या ठिकाणी सणस मैदानप्रमाणे लवकरच फोटो पॉईंट्स बसवण्यात येणार असल्याचे अजय खेडेकर यांनी सांगितले़
---------------
फोटो मेल केला आहे़
फोटो ओळ :
टोकियो आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोटो पॉईंट्सद्वारे शुभेच्छा देताना, राज्याचे माजी क्रीडामंत्री आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, क्रीडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकण व आदी़