शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय...
2
लाडक्या बहिणींना आता फक्त ५०० रुपयेच मिळणार; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका, म्हणाले...
3
पतीने जेवण मागितले, पत्नीने त्याला बाल्कनीमधून खाली ढकलले; नणंदेने खालून पाहिले, अन्...
4
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: वर्षभर बाप्पा कृपा करेल; चंद्रोदयाला ‘हे’ कराच, पुण्य लाभेल
5
राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?
6
अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल!
7
नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...
8
३० वर्षाची सुंदरी अन् ६० कोटींची डील..; बांगलादेशाच्या मॉडेलनं सौदीसोबतच केला कांड
9
चमचमीत अन् चविष्ट! पुण्यातील शेफने अमेरिकन रेस्टॉरंट्समध्ये सुरू केले मराठमोळे पदार्थ
10
IPL 2025: संघ हरल्यावर खरडपट्टी काढणारे संजीव गोयंका चक्क पराभवानंतरही हसले, फोटो VIRAL
11
मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती
12
हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू
13
OYO हॉटेलमध्ये इंजिनिअरनं संपवलं आयुष्य; कहाणीत ट्विस्ट आला अन् गर्लफ्रेंडला झाली अटक
14
"महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका 
15
Trigrahi Yoga 2025: शनि, शुक्र आणि बुधाची त्रिग्रही युती; 'या' पाच राशींच्या आर्थिक वाढीला देतील गती!
16
फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच!
17
मोटारसायकलवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, नागपुरात रेस्टॉरंट मालकाची हत्या!
18
टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?
19
सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण; १ हजार ८०० कोटींचा खर्च
20
खळबळजनक! सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं, स्मशानभूमीतून आणली राख अन्...

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी मिळणार साडेनऊ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:38 IST

महापालिका स्थायी समितीची मान्यता 

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वंडर सिटी ते राजस सोसायटीदरम्यानच्या जागा भूसंपादन करण्यासाठी जागामालकांना रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी ९ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी देण्यास महापालिका स्थायी समितीने मान्यता आली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम २०१७ पासून सुरू झाले; पण महापालिकेला भूसंपादन करता न आल्याने हा प्रकल्प रखडला आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी जागामालकांशी संवाद साधण्यात आलेल्या अपयशामुळे हा प्रकल्प लांबला आणि त्याच्या भूसंपादनाचा खर्चही वाढला आहे. पूर्वी भूसंपादनासाठी ७५० कोटी रुपये लागणार होते. आता एकूण खर्च ११०० कोटींच्या घरात गेला आहे. राज्य सरकारने भूसंपादनासाठी १३९.८३ कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. महापालिकेने यासाठी आणखी ४२५ कोटी रुपये शासनाकडे मागितले आहेत. कात्रज एसएचएआयतर्फे चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.त्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, उड्डाणपूल आम्ही स्वखर्चाने बांधतो, असे महापालिकेला सांगितले होते. त्यानुसार ५० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. सात जागामालकांकडून २७०५ चौरस मीटर जागा ताब्यात घेण्यासाठी मूल्यांकन करण्यात आले आहे. मुद्रांक ७ टक्के शुल्क, नोंदणी शुल्क, मोजणी रक्कम आणि एक टक्का टीडीएस कपात करून उर्वरित रक्कम जागामालकास देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रkatrajकात्रजroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या