पुणे : आगामी काळात पालिका दवाखान्यांतही औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या. जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हिमोफिलिया सोसायटी पुणे, वूमन ग्रुप, युथ ग्रुप व बीजे मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. या वेळी हिमोफिलिया सोसायटी पुणेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. चंदनवाले यांनी ससून रुग्णालयातील द केअर सेंटरची माहिती दिली. तसेच महापालिकेने हिमोफिलियाग्रस्त व्यक्तींना मदत करावी, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महापौरांनी मनपाच्या दवाखान्यांमध्ये या रुग्णांना उपचार, औषधे देण्यात येतील, तसेच हिमोफिलिया जागृतीसंदर्भात विविध योजना आखण्यात येतील, असे सांगितले. मृण्मयी कुलकर्णी यांनी हिमोफिलियाग्रस्त मुलांसाठी विविध व्यायामप्रकारावर आधारित नृत्य सादर केले. डॉ. कल्पना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राऊत यांनी आभार मानले. या वेळी हिमोफिलिया सोसायटीचे अनिल ललवाणी, रशीद ललानी, डॉ. सुनील लोहाडे, अनिता भोसले आदीे उपस्थित होते.
पालिका उपलब्ध करणार हिमोफिलियावर उपचार
By admin | Published: April 24, 2017 5:03 AM