पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांतील सर्व कर्मचाºयांनी एल्गार पुकारला असून, त्यांनी बुधवारपासून (दि. ९) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी काळ्या फिती लावलेल्या होत्या.बारामती : बारामती नगरपालिकेतील सर्व कर्मचाºयांनी बुधवारपासून (दि. ९) काम बंद आंदोलन पुकारले आहे. नगरपालिका प्रशासन अंतर्गत काम करणाºया सर्व कर्मचारी व कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे.ल्ल जेजुरी नगरपालिकेतील कर्मचारी-अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे राजेंद्र गाढवे, बाळासाहेब खोमणे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट रोजी एक दिवस काम बंद आंदोलन केले असले, तरी सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे रखडवली नसल्याचे त्यांनी सांगितले. इंदापूर : इंदापूर नगर परिषदेतील १०३ कर्मचाºयांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावा. सहावा वेतन आयोग लागू करावा, या व इतर मागण्यांसाठी इंदापूूूर नगर परिषदेच्या कर्मचाºयांनी आज (दि. ९) पासून काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरू केले.बुधवार (दि. १४) पर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसे निवेदन आज कर्मचाºयांनी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्याकडे दिले. या निवेदनाखाली भारतीय मजदूर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन शिंदे, सुरेश सोनवणे, दिनकर गायकवाड, सुनील लोहिरे, अशोक अडसूळ, विजय भोसले, जयेश लोखंडे, अशोक शहा, सुभाष ओहोळ आदींसह ४० जणांच्या सह्या आहेत. आळंदी : नगर परिषदेतील कामगारांनी कार्यालयासमोर एकदिवसीय काम बंद आंदोलन केले.महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना, संवर्ग कर्मचारी, नगर परिषद, महानगरपालिका कर्मचारी महासंघ, राज्य सफाई कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी, समन्वय समिती, रोजंदारी कर्मचारी कृती समिती व इतर सर्व सफाई कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाकडे विविध न्याय्य मागण्यांसाठी पहिल्या टप्प्यातील हे काम बंद आंदोलन करण्यात आले.या वेळी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, संघटनेचे अध्यक्ष अरुण घुंडरे, रामदास भांगे, डी. बी. सोनटक्के, रमेश थोरात, परशुराम जाधव, संघपाल गायकवाड, जितेश पाटील, मालन पाटोळे, देवश्री कुदळे, नगरसेवक पांडुरंग वहिले, नंदकुमार जाधव, भागवत सोमवंशी आदींसह सर्व नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. शिरूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिरूर नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. ९) सर्व कर्मचाºयांनी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.संघटनेचे अध्यक्ष दशरथ मोरे, नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष दशरथ मोरे, उपाध्यक्ष रामचंद्र चौधरी, सचिव एकनाथ गायकवाड, सहसचिव महेश कदम, खजिनदार विजय भोसले, अयुब सय्यद, संजय कुंभार, अप्पासाहेब पोटघन, अमृत भवर, उत्तम कांबळे, राजेंद्र वाघमारे, दिलीप गोटे, निर्मला पाटील, मंगल चिमटे, स्वच्छता विभाग निरीक्षक दत्तात्रय बर्गे, प्रमोद पवार, अनिल चव्हाण, रवींद्र वाघमारे, भारत गायकवाड, विनोद उबाळे, धनंजय धुमाळ उपस्थित होते. चाकण : नगर परिषदेमधील सर्व कामगारांनी मागण्यांसंदर्भात एकदिवसीय रजा काम बंद आंदोलन करून मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा मंगल गोरे यांच्याकडे दिले.२१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी शिवाजी मेमाणे, संवर्ग कर्मचारी ऋती सोमवंशी, शमशाद मोमीन, कोमल सावरे, विजय भोंडवे, दीपक उकिरडे, दत्तात्रय गोरे, विजय भोसले, संतोष शिंदे, प्रियांका राऊत आदी कामगारांनी सांगितले. संचालक नगर परिषद विकास विभाग यांनी सर्व प्रतिनिधींची ११ आॅगस्टला बैठक बोलावल्याचे विजय भोंडवे यांनी सांगितले.९ आॅगस्टला एकदिवसीय काम बंद आंदोलन, १० ते १४ आॅगस्टला काळ्या फिती लावून काम करणे, १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, राज्यमंत्री, मंत्रिमहोदयांना निवेदन देणे आणि त्यानंतर मागण्या मान्य नाही झाल्या, तर २१ आॅगस्टपासून बेमुदत बंद, असे आंदोलनाचे राज्यस्तरीयस्वरुप असणार आहे.संघर्ष समितीच्या वतीने राज्यस्तरावर शासनाकडे विविध १६ मागण्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करणे, १०० टक्के वेतन शासनामार्फत देणे, सर्व मुख्याधिकाºयांचा दर्जा गट ‘अ’ करणे, सफाई कर्मचाºयांना मोफत घरे देणे, महिला कर्मचाºयांना बालसंगोपन रजा ई.विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. यासह अनेक मागण्यांसाठी कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात उतरल्या आहेत.महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगर पंचायत, मुख्याधिकारी-कर्मचारी, संवर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने९ आॅगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय काम बंद आंदोलनामध्ये जेजुरी नगरपालिका कर्मचाºयांनी आपला पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला.राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी आदींच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. याबाबत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. बुधवारी (दि. ९) बारामती नगरपालिकेतील कर्मचाºयांनी धरणे आंदोलन केले. गुरुवारपासून ते सोमवारपर्यंत (दि. १० ते १४) काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. तसेच २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
नगरपालिका कर्मचाऱ्यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 2:46 AM