PMC| मेट्रो प्रकरणावरून पालिकेत विरोधकांचा 'राडा'; महापौरांनी गुरुवारपर्यंत तहकूब केले सभागृहाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:15 PM2021-12-21T15:15:05+5:302021-12-21T15:18:33+5:30

महापौरांनी मेट्रोच्या कामाला आदेश का दिले म्हणत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज थांबविले

municipality metro issue ganesh visarjan assembly adjourned till thursday murlidhar mohol | PMC| मेट्रो प्रकरणावरून पालिकेत विरोधकांचा 'राडा'; महापौरांनी गुरुवारपर्यंत तहकूब केले सभागृहाचे काम

PMC| मेट्रो प्रकरणावरून पालिकेत विरोधकांचा 'राडा'; महापौरांनी गुरुवारपर्यंत तहकूब केले सभागृहाचे काम

Next

पुणे: शहरात सध्या अनेक मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी पुलावरील अर्धवट राहिलेले मेट्रोच्या पुलाचे काम पुन्हा सुरू केले होते. त्यामुळे आज महापालिका सभागृहात (Pune Municipal Corporation) विरोधकांनी काम थांबविले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा येत असताना काम सुरू करण्याचे आदेश महापौरांनी का दिले म्हणत पालिकेत विरोधी बाकावर असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडले.

विरोधकांचा वाढत्या विरोधामुळे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत (२३ डिसेंबर) तहकूब केले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. यावर बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, सभागृहाचे कामकाज अशा पद्धतीने बंद पाडणे योग्य नाही. चर्चा न करता अशाप्रकारे कामकाजात व्यत्यय आणल्याने सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात येत आहे. 

Web Title: municipality metro issue ganesh visarjan assembly adjourned till thursday murlidhar mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.