शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पालिका निवडणुकीत आघाडीसाठी आग्रह

By admin | Published: June 16, 2016 4:00 AM

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी व युती होईल की स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाईल याचीच.

पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी व युती होईल की स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाईल याचीच. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या पक्षसंघटना स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असल्या तरी विद्यमान नगरसेवकांची इच्छा मात्र निवडणूक संयुक्तपणे लढविली जावी, अशीच असल्याचे दिसते आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती हेच यामागचे कारण आहे.विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग नव्या प्रभागरचनेत बरेचसे बदलले जाणार आहेत. त्याचाही फटका निवडणुकीत बसण्याची भीती त्यांच्या मनात आहे. युती किंवा आघाडी झाली व विद्यमान नगरसेवकच बरोबर असेल तर त्याच्या हक्काच्या मतांचा फायदा होईल. तसे नाही झाले तरी बरोबर असलेल्या पक्षाची हक्काची मते मिळून त्याचा उपयोग होईल असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या संयुक्त प्रचारसभा होतील, खर्च विभागला जाईल, अशा अनेक गोष्टी आघाडी किंवा युतीच्या पुष्टीसाठी विद्यमान नगरसेवकांकडून सांगितल्या जात आहेत. प्रमुख चारही राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक त्यामुळेच निवडणुकीत थोडे पुढेमागे करून आघाडी किंवा युती व्हावी याच मताचे आहेत. दुसरीकडे पक्षसंघटना मात्र स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहेत. आघाडी किंवा युती केली तर फायद्यापेक्षा राजकीय नुकसानच जास्त होते, असे संघटनात्मक पदाधिकारी, पहिल्या फळीतील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.महापालिकेची याआधीची निवडणूक या सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढविली होती. त्या वेळी दोन सदस्यांचा एक प्रभाग होता. मात्र आता चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार आहे. एका प्रभागात साधारण ८० ते ९० हजार मतदार असतील. हे भले मोठे प्रभाग म्हणजे लहान विधानसभा मतदारसंघांचीच प्रतिकृती असणार आहेत. निवडणुकीचा खर्च, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कमी कालावधीत सर्वांपर्यंत पोहोचणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आवश्यक अशा सर्वच गोष्टींसाठी मर्यादा येणार आहेत. त्यामुळेच विद्यमान नगरसेवक धास्तावले आहेत.