शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या- अॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 1:33 AM

वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे.

जेजुरी : वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. हिटलरशाही आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. वंचित समाजाने वेळीच सावध होऊन एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येथील पालखी तळावर समस्त धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीने जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते.अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुवादी विचारसरणी बहुजनांचा विचार करूच शकत नाही.

बहुजनांवर वर्चस्व टिकवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. याचबरोबर राज्यातील बहुजनवर्ग दुष्काळात होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करावयाचा नाही.खासदार राजू शेट्टी म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या मेळाव्यात सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना आता या आश्वासनाचा विसर पडला आहे. आरक्षणाचे भूत खेळवत ठेवले जात आहे. राज्यातील संविधानप्रेमींनी एकाच व्यासपीठावर यायला हवे तरच परिवर्तन होईल.

यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळावयाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यभरातील धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यभरातून आलेले धनगर व बहुजन एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी वंचितांची सत्ता आणण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर