शहरं
Join us  
Trending Stories
1
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
2
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
3
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
4
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
5
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
6
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
7
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
8
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
9
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
10
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
11
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
12
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
13
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
14
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
15
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
16
JEE Mains 2025: राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर
17
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
18
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
19
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
20
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी

Pune Crime: विश्रांतवाडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 09:09 IST

विश्रांतवाडी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले

येरवडा : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना बुधवारी रात्री विश्रांतवाडी येथे घडली. या घटनेत तुषार जयवंत भोसले (वय 28, रा. दांडेकर पूल, पुणे ) याचा खून करण्यात आला असून याप्रकरणी विश्रांतवाडीपोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तुषार याच्यावर येरवडा तसेच दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे शरीरा विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हा पूर्वी त्याच्या मामाकडे विश्रांतवाडी येथे राहत होता. या ठिकाणी त्याचे काही दिवसांपूर्वी भांडण झालेले होते. बुधवारी सायंकाळी तो विश्रांतवाडी येथील वडारवस्ती येथे आल्यानंतर जुन्या भांडणातून पुन्हा वाद झाला. यामध्ये त्याला पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले. उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलिसांनी धाव घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लहू  सातपुते करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेVishrantwadiविश्रांतवाडीPoliceपोलिसArrestअटक