शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अनैतिक संबंधातून विजय ढुमे याचा खून; महिलेसह पाच जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 10:14 IST

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी ३६ तासांत छडा लावून ५ जणांना ताब्यात घेतले

धायरी: हॉटेल व्यावसायिक असलेल्या विजय वसंत ढुमे याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड झाले असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी ३६ तासांत छडा लावून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका महिलेसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

सुजाता समीर ढमाल (वय ३३, रा. किरकिटवाडी, नांदोशी रस्ता, पुणे), तिचा नवीन प्रियकर संदीप तुपे (वय २७, रा. कांदलगाव, ता. इंदापूर), सागर तुपसुंदर ( वय १९, रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (वय १८, रा. उंड्री-पिसोळी) आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि.२९ सप्टेंबर) सायंकाळी पावणेसात वाजता दावत हॉटेलच्या मागील क्वॉलिटी इन लॉजच्या पार्किंगमध्ये चिंचवड येथे राहणाऱ्या विजय ढुमे याच्या डोक्यात लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

सिंहगड रस्ता पोलिसांनी परिसरातील जवळपास ७० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून आणि मयत विजय ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता ढमाल हिच्या सखाेल तपासाअंती सुजाता ढमाल, तिचा नवीन प्रियकर संदिप तुपे आणि त्याच्या साथीदारांसह मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून अटक आरोपींच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील आरोपी संदिप दशरथ तुपे याच्याविरुद्ध टेंभुर्णी, इंदापूर आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलिस अंमलदार सतीश नागूल, सुनील चिखले, पोलिस हवालदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे.

मानसिक अन् शारीरिक छळ करायचा म्हणून केला खून...

या प्रकरणातील आरोपी महिला सुजाता ढमाल ही सिंहगड परिसरात राहावयास असून, तिचे विजय ढुमे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर तिचे संदिप तुपे याच्याबरोबरही प्रेमसंबंध तयार झाले. त्यावेळी तिने विजय ढुमे हा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे संदीप तुपे याला सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी इतर साथीदारांसह त्याचा काटा काढण्याचे ठरविले. घटनेच्या दिवशी दुपारी क्वॉलिटी इन लॉजमध्ये विजय ढुमे व सुजाता ढमाल हे दोघे भेटले. त्यानंतर सुजाता ढमाल ही तिथून निघून गेली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजय ढुमे हा लॉजमधून बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचा खून केला.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाArrestअटक