पुणे : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. मध्यरात्री एकच्या सुमारास उघडतीस आलेल्या या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राधा माधवन नायर (वय ७१, रा. बिल्डिंग क्रमांक १०, अंबानगरी सहकारी सोसायटी, धानोरी रस्ता, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा नातू मेहुल संजय निजवान (वय २१, रा. गुरूद्वारा पारशी जिमखान्या समोर, लष्कर, पुणे) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा या शनिवारी दिवसभर घरामध्ये एकट्या होत्या. दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान त्यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्याशी झटापट केली. अंगावरील दागिने काढून प्रयत्न करीत असताना त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. त्यांचा गळा चिरून खून केल्यानंतर राधा यांच्या हातातील बांगड्या, गळ्यातील सोनसाखळी काढून पळ काढला. ही घटना रात्री उशिरा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटी तसेच आसपासच्या भागातील सीसाटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
विश्रांतवाडीत ज्येष्ठ नागरिक महिलेचा खून, चोरीच्या उद्देशाने खुनाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:30 AM
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली.
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खूनअंगावरील दागिने काढून प्रयत्न करीत असताना त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वारसोसायटी तसेच आसपासच्या भागातील सीसाटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू