अभिषेक संतोष फुलंब्रीकर (वय १७, रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर गणेश भैरू रेड्डी (वय २५, रा. बालाजीनगर, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक याच्या आई मालिनी संतोष फुलंब्रिकर (वय ४६, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. अकोला) यांनी चाकण पोलीस ठाण्यात या फिर्याद दिली आहे. अभिषेक आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी अभिषेक याला गोसावीनगर येथील मैदानावर नेले. तिथे त्याला शिवीगाळ करून लाकडी काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. यात अभिषेक याच्या डोक्यात, डोळ्यावर, तोंडावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिघेही पळून गेले. त्यानंतर चारच तासात पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश रेड्डी याला अटक केली. दरम्यान उपराच सुरु असताना अभिषेक फुलंब्रिकर याचा मृत्यू झाला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे, सहा. पोलीस निरीक्षक, विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, विजय जगदाळे, विठ्ठल कुंभार, सुरेश हिंगे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे , अशोक दिवटे, निखील वर्पे हे करीत आहे.
---------------------------------------------------------------