पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला बांबूने बेदम मारहाण केल्याची विश्रांतवाडीमधील आर्दश इंदिरानगरमध्ये घडली.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी दोन गटात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आशिष परदेशी (वय १९), शुभम म्हामुळकर (वय २१), विष्णू मुदलीयार (वय ३०), शशिकांत जवळगे (वय १९, सर्व रा. आदर्श इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुखतार मसली (वय २४, रा. आळंदी रस्ता, येरवडा ) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुखतार यांचा मित्र युनूसला आरोपी मारहाण करीत होते. त्यावेळी मुखतार आणि इरफान भांडणे सोडविण्यासाठी गेले होते. त्याचा राग मनामध्ये धरून टोळक्याने मुखतारला डोक्यात बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
दुसऱ्या फिर्यादीनुसार मारहाण करणा-या मित्राला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी प्रशांत परदेशी (वय २०) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांतचा मित्र विष्णूसोबत टोळक्याची भांडणे सुरू होती. त्यामुळे प्रशांत भांडण सोडविण्यासाठी गेला असता, आरोपींनी त्याला दांडक्याने मारहाण करून सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे.