शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संगीत रंगभूमी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:11 AM

मराठी संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, स्वरराज छोटा गंधर्व आदी दिग्गज कलाकारांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविला.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - मराठी संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, स्वरराज छोटा गंधर्व आदी दिग्गज कलाकारांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविला. सध्या संगीत रंगभूमी बिकट अवस्थेत असून शासनाचे सांस्कृतिक धोरणही कमालीचे उदासीन आहे. संगीत नाटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना २०१३ नंतर शासनाकडून अनुदानच मिळालेले नाही. कलावंतांच्या भेटीबाबतच्या पत्राला उत्तर देण्यासाठीही सांस्कृतिक मंत्र्यांकडे वेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था आणायची असेल, तर संगीत नाटकांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याबाबत पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार, निर्मला गोगटे, पं. अरविंद पिळगावकर, मधुवंती दांडेकर, रजनी जोशी, बकुळ पंडित आणि महाराष्ट्रातील एकूण १५ कलावंतांच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना पत्राद्वारे भेटीबाबत विचारणा केली होती. या पत्राचा गांभीर्याने विचार करण्याची विनंतीही करण्यात आली होती. संगीत रंगभूमीच्या पुनरुत्थानाविषयी पत्राचा पाठपुरावा करण्यात आला. पहिले पत्र २३ जानेवारी २०१७ रोजी पाठविण्यात आले. त्यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा पत्राद्वारे बैठकीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, सांस्कृतिक मंत्रालयाकडून या पत्राची दखलही घेण्यात आलेली नाही.रामकृष्ण मोरे सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी संगीत नाटकांच्या प्रयोगांसाठी अनुदान योजना जाहीर केली. एका नाटकाचे २५ प्रयोग झाल्यास प्रत्येक प्रयोगासाठी १५,००० आणि ५० प्रयोग झाल्यास प्रत्येक प्रयोगासाठी ५०,००० रुपयांचे अनुदान दिले जात होते.संस्थांनी नाटकांचे प्रयोग झाल्याचे पुरावे, बिले पाठविल्यानंतर हे अनुदान जमा होत असे. कालांतराने ही योजना बंद पडली. सध्याच्या सरकारच्या काळात या योजनेला वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या आहेत. एका संगीत नाटकासाठी सध्याच्या काळात साधारणपणे एक लाख रुपये खर्च येत असताना शासन अनुदानाबाबत उदासीन असल्याची खंत बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.शासनाने संस्थांची क्षमता, कार्याची पद्धत, प्रयोगाची संख्यात्मक आणि गुणात्मक पातळी, दौरे, नवीन पिढीसाठी केलेले काम आदींचा आढावा घेऊन अनुदानाची रक्कम नियमितपणे विस्तारित करावी. योग्य सर्वेक्षण न झाल्यास केवळ कागदी घोडे नाचविणाºयांना लाभ मिळतो आणि तळमळीने काम करणाºया संस्था बाजूला राहतात.- कीर्ती शिलेदार, नाट्य संमेलनाध्यक्षसंगीत नाटकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नागपूर, सोलापूर, अमरावती, पुणे, सांगली, मुंबई अशा विविध शहरांतील सुमारे १,००० लोकांशी बोलून सर्वेक्षण करण्यात आले आहे. ९० टक्के लोकांनी संगीत नाटकांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संगीत नाटकांच्या पुनरुत्थानासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत.- सुरेश साखवळकरसांस्कृतिक धोरणांतर्गत संगीत नाटकांसाठी काम करणाºया संस्थांना अ, ब, क श्रेणीनुसार २५ हजार, ५० हजार आणि १ लाख रुपये असे अनुदान मंजूर करण्यात आले. हे अनुदान दर ३ वर्षांनी मिळत असे. आता अनुदानाची रक्कम दुप्पट करण्यात आली असून, ४ वर्षांतून एकदा अनुदान दिले जाते. त्यासाठी संस्थेने प्रयोग विनामूल्य सादर करावेत, अशी अट घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून हे अनुदानही जमा करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात एकूण ३५ संस्था कार्यरत असून, शासनदरबारी त्यांची दखल कशी घेतली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या