शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत

By admin | Published: January 13, 2017 3:18 AM

‘संगीत आणि पुणं याचं एक अतूट नातं आहे. संगीताविषयी इथले कानसेन जागृत असल्याने कलाकाराला कुठं आणि

पुणे : ‘‘संगीत आणि पुणं याचं एक अतूट नातं आहे. संगीताविषयी इथले कानसेन जागृत असल्याने कलाकाराला कुठं आणि कशी दाद द्यायची हे त्यांना अचूक कळते. पुणेकरांच्या ‘डीएनए’मध्येच संगीत आहे, पुणं हे माझं दुसरं घरच आहे,’’ अशा शब्दातं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी दर्दी पुणेकरांवर स्तुतिसुमने उधळत पुण्याच्या आठवणींना उजाळा दिला. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्या वतीने आयोजित पंधरावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सिटी प्राईड कोथरूड येथे रंगला. या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शिका व अभिनेत्री अपर्णा सेन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अ‍ॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुण्याविषयी बोलताना झाकीर हुसेन म्हणाले, वयाच्या सातव्या वर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तबलावादन करण्याची संधी मिळाली, संगीत, त्याची साधना म्हणजे काय? या गोष्टी पुण्यात आल्यानंतर कळतात. बालगंधर्व, कुमार गंधर्व, अप्पा जळगावकर यांना मी साथसंगत केली आहे. संगीत हे पुणेकरांच्या रक्तामध्ये आहे. नाट्यसंगीताचे वातावरण पुण्यात असल्याने शास्त्रीय संगीतालाही पुणेकरांनी आपलेसे केले. उर्दू गझलचे मुशायरेही इथे ऐकले जातात, भाषा भलेही कळत नसली तरी त्यामध्येही ते समरसून जातात. एस.डी. बर्मन यांच्या ‘डॉ. विद्या’ या चित्रपटात मी वादन केले आहे. ते म्हणजे संगीतातील देव आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्काराला मी खरच पात्र आहे का नाही, हे माहीत नाही, असे सांगून आपल्या मोठेपणाचे दर्शनही त्यांनी घडविले. तसेच आजचे संगीत हे चांगले आहे. ए. आर. रेहमान, शंकर एहसान लॉय यांच्यासारखे लोक चांगले काम करत आहेत. संगीत हे दिग्दर्शक, निर्मात्यांच्या आवडीनुसार द्यावे लागते. माझ्यासाठी वेळ देणारे दिग्दर्शक, निर्माते हवे आहेत, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. उद्घाटन सोहळ्याला प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गौरी रामनारायण (भारत), बेनेट रतायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) उपस्थित होते.पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. श्रीरंग गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले तर पिफचे सचिव डॉ. रवी गुप्ता यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पिफ अध्यक्षांनी शासकीय अधिकाऱ्याला डावलले पिफ हा शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री उद्घाटन किंवा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाहीत, मात्र हा शासनाचा महोत्सव असल्याने एक तरी अधिकारी असणे अपेक्षित आहे.  राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या पश्चिम विभागाच्या सहायक संचालक अमिता तळेकर महोत्सवाला उपस्थित होत्या, मात्र पिफचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना व्यासपीठावर बोलवणेच टाळले. ४याविषयी डॉ. जब्बार पटेल यांना विचारले असता त्यांनी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आम्ही कोणतीच रिस्क घेतली नसल्याची सारवासारव केली.  मला पैठणी का नाही? झाकीर हुसेन यांचा मिश्कील सवालपुरस्कार सोहळ्यात अपर्णा सेन आणि सीमा देव यांना पैठणी देण्यात आली, त्यावर श्रीरंग गोडबोले यांनी जब्बार म्हणजे आदेश बांदेकर झाले आहेत, अशी मिश्कील टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. उस्ताद झाकीर हुसेन पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांना पुणेरी पगडी आणि उपरणे देण्यात आले. त्यावर ‘मला पैठणी का नाही?’ असा सवाल त्यांनी केला आणि उपरण्यामध्येच पैठणीची पोज दिली. उद्घाटन सोहळ्याला रसिकांची पाठगेल्या वर्षी पिफच्या उद्घाटन सोहळ्याला तुंडुब गर्दी झाली होती, पाय ठेवणेही मुश्कील झाले होते, यंदा मात्र रसिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. नोटाबंदीचा फटका महोत्सवाला बसला असल्याची कुजबुज रंगली होती.