पुणे : ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी (८८) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘मनातल्या भावकळ्या’ या भावगीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली होती. ‘मुलाफुलांची गाणी’ आणि ‘सायसाखरेची गाणी’ या बालगीतांच्या लोकप्रिय कार्यक्रमांसह ‘सूर शब्द लहरी’ या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाची निर्मितीही त्यांनी केली होती. स्वामी विवेकानंद यांचे गीतरूपी चरित्र असलेल्या ‘तेजाची आरती’, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे चरित्र असलेले ‘गीत गाते इंद्रायणी’ आणि भक्तिगीतांवर आधारित ‘नाम घेता भगवंताचे’ हे त्यांचे कार्यक्रम गाजले होते.
संगीततज्ज्ञ पं. म. ना. कुलकर्णी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:48 AM