बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणाची केरळवासियांसाठी मदतीची साद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:07 PM2018-08-21T20:07:15+5:302018-08-21T20:13:36+5:30

आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने  रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या केरळवासियांच्या मदतीच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले.

The Muslim youth will be able to help the Kerala citizens on the ocasion of Bakri Id | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणाची केरळवासियांसाठी मदतीची साद 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणाची केरळवासियांसाठी मदतीची साद 

Next
ठळक मुद्देकुर्बानी केरळसाठी - पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनपैगंबर शेख हा छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर रविवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह व्हिडिओद्वारे आवाहन

वारजे : कधी कधी सामाजिक बांधिलकी जपताना धर्माच्या भिंती नकळत अस्पष्ट होतात. केरळमधील नैसर्गिक आपत्तीच्या निमित्ताने ही सामाजिक सलोख्याची सद्भावना जपत एका मुस्लिम बांधवाने बुधवारी देशभरात साजरा होणाऱ्या बकरी ईद च्या निमित्ताने आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. ईदच्या निमित्ताने खरेदी होणाऱ्या बकऱ्याच्या खर्चाला कात्री लावत हा निधी केरळमधील पुरग्रस्त बांधवांना हस्तांतरीत करण्याचे आवाहन पुण्यातील वारजे येथील पैगंबर शेख  हा  मुस्लीम तरुण करत आहे.

 आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले.केरळवासियांना मदत करण्यासाठी रविवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह व्हिडिओद्वारे आवाहन केले. कुर्बानीसाठी काही नागरीक अफाट खर्च करत असतात. यासाठी मोठा व विशेष बोकड खरेदी करण्याच्या पावित्रा अनेक जणांचा असतो.अल्लाह हा फक्त आपली नियत व भावना पाहत असतो. केरळ मधील आपले बंधु भगिनी नागरीक हे अस्मानी संकटात असताना आपण फक्त टिव्ही व वर्तमान पत्रात बातम्या वाचून सुस्कारा सोडण्यात अर्थ नाही. यासाठी फक्त मुस्लिमच नाही तर सर्व धर्मीय बंधु भगिनींना आवाहन करण्यात आले आहे. निधी हस्तांतरीत केल्यावर त्याचा स्क्रीन (स्नप) शॉट आपल्या फेसबुक पेजवर प्रसारीत करण्याचे आवाहन देखील केले आहे. ज्याने इतर जणांना अशी मदत करण्याची चालना मिळेल. 
पैगंबर शेख हा छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याने गेल्याच आठवड्यात संविधान सन्मान सभेत सहभागी होण्याचे आवाहनाला देखील खूप प्रतिसाद मिळाला होता. तो स्वत: देखील या सभेत सामील झाला होता. याशिवाय गड संवर्धन व गड भटकंती मोहिमेत देखील तो सहकार्यांंसह अग्रेसर आहे. 
.................................
बकरी ईदच्या तुमच्या कुर्बानीतील काहीच अंश अल्लाहपर्यंत पोहचत नाही जी पोहचते ती फक्त तुमची सद्भावना. या ईदला जर आपण केरळवासियांच्या दु:खावर अशा प्रकारची मदत करून काहीअंशी फुंकर मारायचा प्रयत्न केला पाहिजे. हीच इस्लामची शिकवण आहे. माझे मित्र समीर नदाफ याने बोकडाच्या खरेदीतील हिस्सा व मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चात कपात करून तीन हजार रुपये केरळ मुख्यमंत्री निधीमध्ये ट्रान्स्फर केले आहेत. निधी हस्तांतरित करण्यासाठी आॅनलाइन ट्रान्सफर सुविधा उपलब्ध असून यासाठी सरकारने स्टेट बँकेचे खाते उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय पेटीम या आॅनलाइन पेमेंट प्रणालीमध्ये देखील केरला / कोडगू फ्लड या नावाने पेमेंटची लिंक उपलब्ध आहे.  पैगंबर शेख
#कुर्बानीकेरळसाठी 

Web Title: The Muslim youth will be able to help the Kerala citizens on the ocasion of Bakri Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.