इंदापूर : सध्या आपला देश या कोरोना संकटात अडकला आहे. आपण सर्वांनीच आपले कर्तव्य पणाला लावून अडचणीतील नागरिक, रुग्ण, आरोग्य सेवा देणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तिसऱ्या कोरोना लाटेत आरोग्य विभागासह सर्वांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने मांडले.
इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, रुग्णकल्याण समितीची बैठक सोमवार (दि.१७) रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ, पंचायत समिती माजी उपसभापती देवराज जाधव, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील गावडे, बिजवडीचे सरपंच दादाराम काळेल, पोलीस पाटील रेश्माताई भिसे, डॉ. चंदनशिवे मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील आढावा बैठकीत प्रवीण माने यांनी सूचना केल्याप्रमाणे, लांब पल्याचा प्रवास करून, येणाऱ्या नागरिक व रुग्णांसाठी सावली व्हावी यासाठी मंडप टाकण्याच्या केलेल्या सूचनेला, दाद देवून केलेल्या सावली बाबत प्रवीण माने यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे आढावा बैठकीत बोलताना प्रवीण माने व मान्यवर.