पुणे : मुठा कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पुलाजवळील वसाहतीत शिरल्याने अनेक घरांमधील सामान वाहून गेले. पाण्याचा जाेर इतका हाेता की अनेक घरांच्या भिंती तुटून घरातील सामान जवळील अाेढ्यात गेले. या अाेढ्यातून ते थेट मुठा नदीला जाऊन मिळाले. एेरवी संथ असणाऱ्या मुठा नदीत अाज मात्र फ्रिज, सिलेंडर, कपाट वाहताना दिसत हाेते.
मुठा कालवा फुटल्याने सिंहगड रस्ता दांडेकर पुलाजवळील वसाहतीत सर्वत्र पाणीच पाणी झाले हाेते. नेहमी वर्दळीचा असणारा दांडेकर पूल अाज पाण्याने वाहत हाेता. पाण्याचा माेठा लाेंढा सिंहगड रस्त्यावरुन दांडेकर पुलाजवळील वसाहतीत शिरल्याने घरातील सामान वाहून गेले. या वसाहतीच्या मागच्याच बाजूला नाला असल्याने हे सर्व सामान या नाल्यातून थेट मुठा नदीपात्रात गेले. छाेट्या सामानबराेबरच फ्रिज, सिलेंडर, कपाटेही या पाण्यात वाहून गेली. काही नागरिकांनी तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भिडे पुलाजवळ पाण्यात वाहत अालेल्या वस्तू बाहेर काढल्या. यात माेठ्याप्रमाणावर सिलेंडर हाेते. वसाहतीत लावण्यात अालेल्या दुचाकी या पाण्यामध्ये बुडाल्या. दुचाकींच्या सर्वच भागांमध्ये पाणी शिरल्याने त्या निराेपयाेगी झाल्याचे चित्र हाेते. पाणी अाेसरल्यानंतर सर्वत्र राडाराेडा अाणि चिखल असेच काहीसे दृष्य हाेते.
दाेन तीन तासांनी पाणी काहीसे अाेसरल्यानंतर नागरिकांनी अापले सामान शाेधण्यास सुरुवात केली. अनेकांचे सामान नाल्याच्या कडेला जाऊन पडले हाेते. तर अनेकांच्या विजेच्या उपकरणांमध्ये पाणी शिरल्याने ते खराब झाले हाेते. काबाड कष्ट करुन जमवलेली संपत्ती क्षणार्धात वाहून गेली हाेती. चारचाकींचे सुद्धा माेठे नुकसान यात झाले. दरम्यान सिंहगड रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविल्याने शहरातील इतर रस्त्यांवर माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. शहरातील इतर भागातील नागरिकांना नेमके काय झाले, याची माहिती नसल्याने गाडगीळ पूल तसेच भिडे पुलावर थांबून नदीत वाहत जाणाऱ्या वस्तू पाहून अाश्चर्य व्यक्त करत हाेते.