पिरंगुट : एका बाजूला पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाली, म्हणून सुवर्णमहोत्सव साजरा केला जात असताना दुस-या बाजूला मुळशी तालुक्यातील मुठा येथे असलेल्या पीडीसी बँकेच्या शाखेमध्ये गेले दीड ते दोन महिने इंटरनेट सुविधाच नाही. स्वत:चेच पैसे असतानादेखील बँकेत जाऊन पैसे देता का पैसे असे म्हणण्याची वेळ खातेदारांवर आणलेली आहे.मुठा येथील असलेल्या पीडीसी बँकेला इंटरनेट सुविधा पुरविणाºया कंपनींचा व मुठा येथील इंटरनेटचा टॉवर ज्या व्यक्तीच्या जागेमध्ये आहे त्या व्यक्तीमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत कलह चालू आहे. त्यामुळे बीएसएनएल कंपनी गेले काही दिवस पीडीसी बँकेला इंटरनेट सुविधा पुरवीत नाही.पण या सर्व सावळ्या गोंधळामध्ये नागरिकांचा काय दोष? नागरिकांना आपल्या हक्काचे पैसे असतानासुद्धा या बँकेमधून मिळत नाहीत.या बँकेमध्ये एकूण ७३०० खातेदार आहेत. मुठा खोºयातील एकूण अठरा ग्रामपंचायतींची खाती आहेत. तसेच परिसरातील १५० शिक्षक व अंगणवाडीसेविका यांची खाती असून ३५० संजय गांधी श्रावणबाळ योजनेस पात्र निराधार व्यक्तीची खाती आहेत.आपले पैसे बँकेत जमा झाले की नाही, हे या नागरिकांना समजायला मार्गच नाही. खातेदारांकडून आपल्या बँकेची सुविधा कधी पूर्ववत होईल, अशी विचारणा केली असता अधिकाºयांकडून फक्त लवकरच सुविधा पूर्ववत होईल, असे आश्वासन दिले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र गेले कित्येक दिवस झाले, बँकेचे कामकाज पूर्ववत होत नाही तर बँकेकडून नागरिकांना फक्त वरचेवर आश्वासनच दिले जात आहे.या बँकेमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले असल्याने बँकेमध्ये नुसता शुकशुकाट असतो.या बँकेमध्ये साधारणपणे महिन्याला २००० ग्राहक आपले विजेचे बिल भरत असतात. पण इंटरनेट सुविधा बंद असल्याने वीज बिल भरणा करण्यासाठी २० ते ३० किलोमीटरवरील पिरंगुट येथे जाऊन वीजबिल भरणा करावा लागतो. काही नागरिकांना शंभर रुपयांचे वीजबिल भरण्यासाठी संपूर्ण दिवसाची हजेरी बुडवून पिरंगुट येथे जावे लागते. एवढा नाहक त्रास मुठा खोºयातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.आंदोलनाचा इशाराही सर्व परिस्थिती बघता व नागरिकांना होत असलेला त्रास बघता जर दोन दिवसांमध्ये बँकेने कामकाज सुरळीतपणे सुरू केले नाही तर मुठा खोºयातील सर्व नागरिकांसह बँकेसमोरच मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा वेगरे गावचे आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांनी बँकेस निवेदन देऊन दिलेला आहे.पीडीसी बँकेमध्ये मुठा खोºयातील एवढ्या नागरिकांनी विश्वासाने खाते उघडलेली असताना सद्य:स्थितीमध्ये एवढ्या सर्व नागरिकांना चांगलाच त्रास होत असतानासुद्धा पीडीसी बँक नागरिकांचा त्रास गांभीर्याने का घेत नाही.- नवनाथ येनपुरे, वांजळे ग्रामस्थ
मुठा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सावळा गोंधळ ! खातेदारांचे अतोनात हाल, दोन महिने इंटरनेटच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:05 AM