पुणे : ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची अंमलबजावणी व सहनियंत्रण करण्याचे कामकाज नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांच्याऐवजी पुण्यातील महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी ही योजना सुरु झाली आहे.महिलांच्या कल्याणाबाबतच्या सर्व योजना महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयाकडून राबविण्यात येतात. महिलांच्या कल्याण विषयक कोणत्याही योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाकडून राबविल्या जात नाहीत. त्यामुळे सुकन्या योजनेअंतर्गत करण्यात आलेला सामंजस्य करार हे आयुक्तालय व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेबाबतचा सामंजस्य करार अद्याप भारतीय आयुर्विमा महामंडळाशी झालेला नाही. त्यामुळे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची अंमलबजावणी व सहनियंत्रण करण्याचे कामकाज महिला व बाल विकास आयुक्तांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.महिला व बाल विकास आयुक्तांनी माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा सामंजस्य करार तत्काळ भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्यासोबत करावा. तसेच ३१ मार्च २०१६ व तत्पूर्वी जन्मास आलेल्या लाभाथी मुलींना सुकन्या योजनेअंतर्गत व तद्नंतर माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुज्ञेय लाभ तत्काळ मंजूर करावेत. ही प्रक्रिया १५ मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)योजनेची माहिती आयुक्तांपर्यंत आलीच नाहीसुकन्या योजनेतील लाभार्थ्यांची माहिती, निधीची माहिती इत्यादी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्याकडून अद्याप एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. तसेच सुकन्या योजनेमधील किती लाभार्थ्यांना आयुर्विमा महामंडळाकडून पॉलिसी प्रमाणपत्र देण्यात आले याची माहिती सादर करण्यात आलेली नाही.
‘माझी कन्या भाग्यश्री’ आता महिला बाल आयुक्तालयाकडे
By admin | Published: March 08, 2017 4:56 AM