पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आधीच लोक धास्तावले आहेत. कोरोनातून बरे होताच मोकळा श्वास घ्यावा आणि कोरोनातून मुक्तता मिळाली, असे वाटत असतानाच आता म्युकरमायकोसिस या आजाराचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. या आजारामुळे काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घाबरून न जाता या आजाराबाबत जाणून घेण्यासाठी ऑनलाईन या फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.
प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई यांचे विशेष मार्गदर्शनातून म्युकरमायकोसिस आजार नेमका काय? याची सखोल माहिती मिळणार आहे. हा बुरशीजन्य आजार नेमका कोणाला होतो?, आजाराची लक्षणं कोणती? आजारावर मात करण्यासाठी काय? उपाय आहेत? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. भोई यांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहेत. आजाराविषयी जाणून घेण्यासाठी तसेच मनातील भीती दूर करण्यासाठी नक्की आज संध्याकाळी ५.३० वाजता ऑनलाइन फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर.