नाना पाटेकरांची अजित पवारांवर कौतुकाची सुमने; काय म्हणाले नाना...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:43 AM2022-01-22T11:43:32+5:302022-01-22T11:53:37+5:30
नाना पाटेकरकडून अजित पवारांचे कौतुक
पुणे: अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pwar) यांना भेटले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकरांनी अजित पवारांवर कौतुकाची सुमने उधळली. नाना म्हणाले, अजित पवार ज्या पद्धतीने काम करतात ते आपल्या कामाची कधीच जाहिरात करत नाहीत. ते आपलं काम करत राहतात. त्यांची एखादी चुकीची गोष्ट तेवढीच अधोरेखित होत राहते. त्यांनी केलेलं काम हे समोर यायला पाहिजे. ते एक चांगला नेता आहेत.
पुढे बोलताना नाना म्हणाले, राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. आम्ही अगदी छोटसं काम जरी केलं तरी तुम्ही खूप मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे असे असता कामा नये. विरोधी पक्षाला देखील आपणच निवडून दिलेले आहे. जोपर्यंत निवडणूक आहेत तोपर्यंत विरोध योग्य आहे. परंतु एकदा तुम्ही संसदेत, विधानसभेत गेल्यानंतर त्याचे पावित्र्य पाळायला पाहिजे.
'मला असं वाटतं पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्ष कोणीही तिकीट देऊ, मग पहा नका कुणीही पक्ष बदलणार नाही. तिथे काहीतरी नियम असायलाच पाहिजे. निवडणूक लढवण्यासाठी किमान शिक्षणाची अट असायलाच पाहिजे. मला नोकरीला जायचं असेल तर तिथे शिक्षणाची आणि वयाची अट आहे. शासकीय अधिकारी हे सर्व शिक्षित आहेत. परंतु अभिनयाच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात वयाची आणि शिक्षणाची अट नाही, असंही नाना म्हणाले,