शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नाना पाटेकरांची अजित पवारांवर कौतुकाची सुमने; काय म्हणाले नाना...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:43 AM

नाना पाटेकरकडून अजित पवारांचे कौतुक

पुणे: अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pwar) यांना भेटले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकरांनी अजित पवारांवर कौतुकाची सुमने उधळली. नाना म्हणाले, अजित पवार ज्या पद्धतीने काम करतात ते आपल्या कामाची कधीच जाहिरात करत नाहीत. ते आपलं काम करत राहतात. त्यांची एखादी चुकीची गोष्ट तेवढीच अधोरेखित होत राहते. त्यांनी केलेलं काम हे समोर यायला पाहिजे. ते एक चांगला नेता आहेत.

पुढे बोलताना नाना म्हणाले, राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. आम्ही अगदी छोटसं काम जरी केलं तरी तुम्ही खूप मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे असे असता कामा नये. विरोधी पक्षाला देखील आपणच निवडून दिलेले आहे. जोपर्यंत निवडणूक आहेत तोपर्यंत विरोध योग्य आहे. परंतु एकदा तुम्ही संसदेत, विधानसभेत गेल्यानंतर त्याचे पावित्र्य पाळायला पाहिजे.

'मला असं वाटतं पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्ष कोणीही तिकीट देऊ, मग पहा नका कुणीही पक्ष बदलणार नाही. तिथे काहीतरी नियम असायलाच पाहिजे. निवडणूक लढवण्यासाठी किमान शिक्षणाची अट असायलाच पाहिजे. मला नोकरीला जायचं असेल तर तिथे शिक्षणाची आणि वयाची अट आहे. शासकीय अधिकारी हे सर्व शिक्षित आहेत. परंतु अभिनयाच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात वयाची आणि शिक्षणाची अट नाही, असंही नाना म्हणाले,

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNana Patekarनाना पाटेकरPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड