बारामती: बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे, सचिव सुनील धुमाळ यांनी माहिती दिली.
पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. पतसंस्थेच्या मागील १२ वर्षांपासून संस्थेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. पतसंस्थेच्या सभासदांना पाच लाखांवरून साडेसात लाख कर्जमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली. तसेच, व्याजाचा दर १२ टक्के वरून ९ टक्के इतका करण्यात आलेला आहे, असा ठराव सभासदांनी सर्वानुमते मंजूर केलेला आहे.
राजेंद्र सोनवणे म्हणाले की, पतसंस्थेवर सहकारी बँक अथवा इतर कोणत्याही बँकेचे कोणतेही कर्ज नाही. संस्थेचे भाग भांडवल दाेन कोटी ५३ लाख रुपये असून बँकेत १ कोटी ४८ लाख रुपये बचत खात्यामध्ये शिल्लक आहेत. संस्थेच्या सभासदांना अत्तापर्यंत संस्थेने तीन कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केलेले आहे. यंदाच्या वर्षी संस्थेला ४२ लाख ९ हजार ३६३ इतका नफा झाल्याचे सोनवणे म्हणाले.
या वेळी व्हाईस चेअरमन राजू सुपेकर, संचालक देविदास साळुके, अतुल बनकर, भालचंद्र ढमे, अनिल शिंदे, राजेंद्र शिंदे, निलेश आहिवळे,अरूण थोरात, हनुमंत गायकवाड, संजय गडियल, प्रतिभा सोनवणे, सखु श्याम खरात, अनिल गोंजारी उपस्थित होते. आभार देविदास साळुंके यांनी मानले.