शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिका 'कोरोनाबाधित'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:40 PM

संबंधित परिचारिका दररोज घरी जात असल्याने कुटूंबातील सदस्यही क्वारंटाईन

ठळक मुद्देससून रुग्णालयातील तीन परिचारिकांसह एका डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग

पुणे : ससूनसह अन्य काही खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिकाही कोरोनाबाधित झाली आहे. रुग्णालयातील अन्य डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनासर्दश लक्षणे नसल्याने त्यांची चाचणी केली जाणार नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांसह एका डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत. तर खासगी रुग्णालयातील परिचारिकेलाही काही दिवसांपुर्वी लागण झाली आहे. पण सुमारे दीड महिने नायडू रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या दक्षतेमुळे कोणालाही संसर्ग झालेला नव्हता. पण अखेर रविवारी एका परिचारिकेला लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले. ही परिचारिका सुरूवातीपासून या रुग्णालयात कार्यरत आहे. तिला कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने घशातील स्त्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणु संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये तिला बाधा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. संबंधित परिचारिका दररोज घरी जात असल्याने कुटूंबातील सदस्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.दरम्यान, परिचारिकेला संसर्ग झालेला असला तरी अन्य कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकेमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांची तपासणी केली जाणार नाही. लक्षणे आढळून आल्यानंतरच त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. आतापर्यंतही कोरोना रुग्ण दाखल झाल्यापासून कोणाचीच तपासणी करण्यात आली नव्हती, असे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर