मोरगाव : अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले मासाळवाडी (ता. बारामती) येथील नायकोबा यात्रेसंदर्भात शुक्रवारी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न झाली. यामध्ये कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे,अशी माहीती कमिटीचे सोनाबा ठोंबरे व भाऊसाहेब कांबळे यांनी दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. यावेळी यात्रा कमिटीचे आबा टकले, भाऊसो टकले, खंडु कोळेकर, भाऊसाहेब कांबळे, सोनबा ठोंबरे, सुभाष ठोंबरे आदी उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील नायकोबा हे जागृत स्थान असुन धनगर समाजाचे दैवत समजले जाते. मार्गशीर्ष महीन्याच्या सुरवातीला दरवर्षी येथील यात्रेस सुरवात होते. यंदा १५ डिसेंबरपासून यात्रेला सुरूवात होणार होती. दरवर्षी अहमदनगर, सातारा, सांगली कोकण, नंदुरबार, विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, ठाणे, मुंबई, सोलापूर या राज्याच्या कानाकोपºयातील धनगर समाज यात्रेला जमा होतो. यात्रेनिमित्त पन्नास लाखांपेक्षा अधिक रकमेची खरेदी विक्रीची उलाढाल होते. यात्रेत बकºयांची लोकर, लोकर कातरण्याच्या कात्री, घोंगडी, जान , विळे , कोयते, खुरपी , टिकाव- खोरी, ब्लँकेट आदी धनगर समाजासाठी व शेतकºयांना शेतीसाठी लागणारे साहित्याची विक्री येथे होते.
.....................................................
फोटो ओळ : मासाळवाडी (ता. बारामती) येथील नायकोबा मंदिर.
०४१२२०२०-बारामती-०७
——————————————
===Photopath===
041220\04pun_2_04122020_6.jpg
===Caption===
मासाळवाडी (ता. बारामती) येथील नायकोबा मंदिर.