पुणे (चंदननगर) : संत तुकाराम महाराजांचे बरेचसे बालपण लोहगावात गेले. महाराज आजोळी व कीर्तनासाठी लोहगावमध्ये येत होते. तसेच गावची हजारो एकर जमीन लोहगाव विमानतळासाठी देण्यात आली आहे. याच पावन भूमीमध्ये विमानतळ उभे आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराज विमानतळ नाव द्यावे अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि लोहगावग्रामस्थांनी एका कार्यक्रमात केली आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र नियुक्तीपत्रक प्रदान व पदग्रहण सोहळा लोहगाव येथे गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी गाथा लॉन्स येथे संपन्न झाला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी राष्ट्रीय किर्तनकार व संस्थापक अध्यक्ष हभप.प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी बहुसंख्येने कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार आणि ख्यातनाम गायक अशी पंचक्रोशीतून संतांची मांदियाळी आली होती .
लोहगाव विमानतळाचे नाव "जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ करा या मागणीचा विचार करून हभप. प्रकाश बोधले महाराज, माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक आमदार सुनिल टिंगरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले..लोहगावमध्ये संत तुकाराम महाराजांचे बालपन गेले तसेच लोहगाव विमानततळालाही सर्व जमिनी ह्या लोहगावकरांच्या गेल्या आहेत. त्यामुळे लोहगावकरांच्या मागणीचा विचार करून लोहगाव विमानतळाचे संत तुकाराम महाराज लोहगाव विमानतळ असे करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे.- राजेंद्र खांदवे.