पिंपरी : कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संस्थापक, विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वातील संत तुकाराम शेतकरी पॅनलने विजय मिळविला. २१ जागा जिंकल्या. नवलेंनी वर्चस्व कायम ठेवले, तर बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन शेतकरी पॅनलचा पराभव झाला. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्यांचे आहे. या निवडणुकीत संत तुकाराम शेतकरी पॅनलचे २१ उमेदवार, शेतकरी परिवर्तन पॅनलचे १७ आणि अपक्ष २३ असे ६१ उमेदवार रिंगणात होते. संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यात या कारखान्याने महाराष्ट्रात लौकिक मिळविला आहे. यंदा मात्र मोठ्या प्रमाणावर उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार असे चित्र होते. मुळशी तालुक्यातील कासारआंबोली येथील मुलींच्या सैनिकी शाळेत शनिवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली, तर निकाल रविवारी उत्तररात्री दोनला लागला. अधिकृत निकाल जाहीर होण्यास पहाटेचे तीन वाजले.सर्वाधिक मते...हिंजवडी-ताथवडे गटातून नाना ऊर्फ विदुरा नवले (८३२०), पौड-पिरंगुट गटातून धैर्यशील ढमाले (७३५५), तळेगाव-वडगाव गटातून बापूसाहेब भेगडे (७२८०), सोमाटणे-पवनानगर गटातून सुभाष बोडके (६२२५), खेड-हवेली-शिरूर गटातून अनिल लोखंडे (६६५९), राखीव गटातून अंकुश आंबेकर (६६५१), महिला राखीव गटातून स्वाती भेगडे (७८८३), इतर मागासवर्ग गटातून भाऊसाहेब भोईर (७६४४), भटक्या विमुक्त जाती व जमाती गटातून बाळकृष्ण कोळेकर ( ७९८१) यांना सर्वाधिक मते मिळाली.राखीव गटात अवैध मते अधिकमतदान केंद्रावरील गोंधळ आणि चिन्ह न समजल्याने चुकीच्या पद्धतीने मतदान झाले. एकाच वेळी विविध रंगांच्या नऊ मतपत्रिकांवर २१ मते द्यायची होती. निरक्षर, क्षीण दृष्टी, अपंग आणि वयस्कर मतदारांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अवैध मते अधिक ठरली. हिंजवडी-ताथवडे गटात (६०३), पौड-पिरंगुट गटात (८३०), तळेगाव वडगाव गटात (८१३), सोमाटणे पवनानगरगटात (११६३), खेड हवेली शिरूर गटात (७३४), राखीव गटात (१२८९), महिला राखीव गटात (६९२), इतर मागासवर्ग गटात (११२५), भटक्या विमुक्त जाती व जमाती गटात (१००७) यांना सर्वाधिक मते मिळाली.
नाना नवलेंचे वर्चस्व
By admin | Published: April 06, 2015 5:36 AM