नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 05:42 PM2021-07-10T17:42:32+5:302021-07-10T17:43:29+5:30

संजय राऊतांना सहकारातील काय कळते? 

Nana Patole is the Pappu of Maharashtra: Chandrakant Patil | नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

googlenewsNext

पुणे : काँग्रेसमध्ये जसे केंद्रात एक पप्पू आहेत तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. त्यामुळे ते काहीही विधाने करतात अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तर,संजय राऊत यांना सहकारामधील काय कळतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

पाटील यांनी समाविष्ट गावांमधील ग्रामस्थांशी त्यांच्या अडचणी, समस्या याबाबत चर्चा केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपावर टीका केली होती. त्याचा समाचार पाटील यांनी घेतला. खासदार संजय राऊत यांनी देखील  केंद्राकडे सहकार विभाग गेल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाल्याची टीका केली होती. पाटील यांनी राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना सहकारामधील काय कळतं? एका सहकारी साखर कारखान्यासाठी किती शेयर होल्डर लागतात? त्याच्या प्रमुखाची कामे काय असतात? याचा राऊत यांनी आधी अभ्यास करावा, मग सहकारावर बोलावे. ज्याविषयातील माहिती नाही किंवा संबध नाही शा विषयात बोलू नये असे पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार वाचविला असून साखरेला हमी भाव ठरवून दिला आहे. त्यामुळे साखर उत्पादक शेतकरी आनंदी आल्याचे ते म्हणाले.
=====
सहकार विभाग शहांकडे देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीचा 

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाईनंतर जे पत्र अमित शहा यांना पाठविले, त्यातील कारखान्यांची यादी ही अण्णा हजारे यांनी पाच वर्षांपूर्वीच दिलेली आहे. मी पत्र दिले म्हणून सहकार मंत्रालय अमित शहांकडे गेले नाही. याबाबतचे नियोजन वर्षभरापूर्वी झाले असावे. शहा यांच्यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल असे पाटील म्हणाले.

Web Title: Nana Patole is the Pappu of Maharashtra: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.