नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल; म्हणाले, 'खुर्ची सोडा मगच आम्ही उत्तर देऊ'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 04:14 PM2021-08-01T16:14:24+5:302021-08-01T16:23:53+5:30
एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती
पुणे : राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार नाहीत. ते भगतसिंह कोश्यारी म्हणून बोलत असतील. तो त्यांचा अधिकार आहे. मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. मग आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ. असा हल्लाबोल करत पटोलेंनी राज्यपालांना लगावला आहे.
एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपालांनी केली होती. त्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपाल यांना शोभत नाही.टीका करायची तर खुर्ची सोडा, मग आम्ही बघू, असा टोला पटोले यांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपालांनी भाजपचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं, असंही पटोले म्हणालेत.
पुण्यात नाना पटोले यांच्या हस्ते पूरग्रस्तांना आज मदत पाठवण्यात आली. सारसबाग चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनही केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधता होते. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
कोल्हापूर पूर पाहणीदरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीबाबत काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही. काँग्रेस सरकारची जासूसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करतंय असं ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भेट दिलेली नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा आहे ते काय मदत करतात ते पाहू वादळाच्या वेळेस त्यांनी गुजरातला भेट दिली. मात्र महाराष्ट्राला भेट दिलेली नाही. त्यामुळे आता पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील हे पाहावे लागेल.
मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार
पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मेट्रोचा पाया रोवला गेला. म्हणून आज या पक्षाने सात वर्षे देश मागे नेला आहे. त्याला श्रेय घ्यायचा असेल तर त्यांना लखलाभ असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. त्याचबरोबर मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहोत असंही नाना पटोले यांनी सांगितलं.