सात सदस्य संख्या असलेल्या कर्नलवाडी ग्रामपंचायतीचे मावळत्या उपसरपंच सारिका निगडे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा नियोजित काळात दिल्याने रिक्त झालेल्या जागी सरपंच सुधीर निगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नंदा विलासराव निगडे यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच धनराज कोंडे, विकास कर्णवर, सारिका निगडे सदस्य भाऊसाहेब वाघापुरे, चतुरा गदादे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस पृथ्वीराज निगडे, ज्येष्ठ नागरिक शिवाजी निगडे, भरत निगडे, दशरथ निगडे, मिलेश निगडे, माऊली निगडे, नरसिंग निगडे, गणपत निगडे, ग्रामसेवक हणुमंतराव शिंदे व कर्मचारी शशिकांत निगडे आदी उपस्थित होते.
गावातील महिलांना विविध रोजगारांसाठी मिळणारे प्रशिक्षण गावातच उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थिनींना शिक्षणासाठी लागणाऱ्या सुखसुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नंदा निगडे यांनी व्यक्त केले.