पुणो : शहरातील वाहतूकसमस्या सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणा:या मेट्रो प्रकल्पासाठीच्या कंपनीचे अखेर नामकरण झाले असून, ‘पुणो महानगर मेट्रो रेल कॉपोर्रेशन’ या नावाने या कंपनीची नोंदणी असणार आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारकडून संचालकांची नियुक्ती झाल्यावर कंपनी कार्यान्वीत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या कंपनीच्या माध्यमातूनच मेट्रोसाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार असून, या कंपनीमुळे मेट्रोच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असल्याची माहिती अधिकृत सूत्रंनी दिली.
शहरात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते निगडी या दोन मार्गावर राबविल्या जाणा:या या प्रकल्पासाठी निविदेचा आराखडा तयार करणो, जागतिक निविदा मागविणो, ही प्रक्रिया राबविण्याची ही जबाबदारी या कंपनीवर असणार आहे. पालिकेचा त्यात केवळ समन्वयाचा सहभाग असेल. या कंपनीवर राज्य सरकार पूर्ण वेळ संचालक नियुक्त करणार असून, अन्य विभागांच्या पाच-सहा संचालकांची नियुक्ती करणार आहे. तसेच, केंद्र सरकारही चार-पाच अधिका:यांची नियुक्ती करणार आहे. मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाने औपचारिक मंजुरी दिल्यावर संचालकांची नियुक्ती अपेक्षित आहे. संचालक नियुक्ती झाल्यावर कंपनी कायद्यान्वये त्यांची नोंदणी होऊन मेट्रोला कंपनी म्हणून भाग भांडवल उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर निविदा तयार करण्यासाठी कंपनी तज्ज्ञ संचालक नियुक्त करून जागतिक निविदा मागविण्यात येणार आहे. दरम्यान, मेट्रोच्या मान्यतेसाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी दिल्ली येथे प्री. पीआयबीसमोर सादरीकरण केले असून, कंपनी स्थापनेच्या हालचालीमुळे प्रकल्पास आणखी गती मिळाली असल्याचे सूत्रंनी सांगितले. तसेच कंपनी स्थापन करून तिच्या नोंदणीचीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मंजुरी मिळाल्यावर कंपनीची नोंदणी होणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.