शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नारायणगाव-वारुळवाडी गटात ६५ टक्केमतदान

By admin | Published: February 22, 2017 2:04 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती वार्षिक निवडणुकीत नारायणगाव-वारुळवाडी गटात सरासरी ६५ टक्के मतदान

नारायणगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती वार्षिक निवडणुकीत नारायणगाव-वारुळवाडी गटात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि अपक्ष उमेदवार यांच्यात लक्षवेधी लढत असल्याने या गटाच्या निकालाबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्कंठा लागली आहे. दरम्यान, मतदार यादीतील घोळामुळे व निवडणूक प्रशासनाने आलेल्या स्लिपा अनेक भागात वाटल्या नसल्याने, अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.नारायणगाव-वारुळवाडी गटात सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असून, या जागेसाठी शिवसेनेच्या विद्यमान जि. प. सदस्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीच्या माजी जि.प.सदस्या राजश्रीताई बोरकर, अपक्ष उमदेवार सोनाली मकरंद पाटे व भाजपाच्या मनीषा पारेकर यांच्यात लढत झाली. या गटामध्ये नारायणगाव, वारुळवाडी, मांजरवाडी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव , गुंजाळवाडी, आर्वी, येडगाव, भोरवाडी, धनगरवाडी ही गावे समाविष्ट आहेत. नारायणगाव पंचायत समिती या गणात नारायणगाव, येडगाव, भोरवाडी, धनगरवाडी ही गावे येतात. राष्ट्रवादीकडून प्रीती राजेश कोल्हे, शिवसेनेकडून अर्चना आशिष माळवदकर यांच्यात लढत झाली व वारुळवाडी पंचायत समिती गणात वारुळवाडी, मांजरवाडी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी,आर्वी ही गावे आहेत. या गणात राष्ट्रवादीकडून सुशील सोनवणे, शिवसेनेकडून रमेश खुडे व भाजपाकडून अभय वाव्हळ यांच्यात लढत झाली. या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषद गटात बुचके, बोरकर व पाटे यांच्यात अटी-तटीची लढत झाली आहे. सर्व उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. या गटात एकूण ३७ हजार ७४० मतदार आहेत. नारायणगाव येथे पुरुष ७४२५ व महिला ७०९२ असे १४ हजार ५१७ व वारुळवाडी येथे पुरुष ३४१२ व महिला ३२४९ असे ६ हजार ६६१ मतदान आहे. नारायणगाव, वारुळवाडी गटात एकूण ६४ बूथवर मतदान झाले. सहायक पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस उपनिरीक्षक, १५०  पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. दरम्यान, मतदार यादी १५ दिवसांपुरवी जाहीर करण्यात आली, परंतु अनेक मतदारांची नावे सापडत नसल्याने अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. दुपारपर्यंत ४० टक्केच मतदान झाले होते, दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला, महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.  नारायणगाव गट मतदान केंद्र- २५६- (६८.६८ टक्के), २५७- (५२.११ टक्के),२५८-(६८.६९ टक्के) २५९- (७१.५९ टक्के), २६१- (६४.११ टक्के),२६२- (६७.९८ टक्के)२६३-(६७.२७ टक्के) ,२८७- ( ६६. ९८टक्के) , २८८- ( ५३. ५२ टक्के),२८९- (६५. ०८ टक्के),२९०- (६४.६१ टक्के),२९१- (५०.५२ टक्के),२९२-(५३.०१ टक्के),२९३-(६६.८९ टक्के), २९४-(६६.४७ टक्के) २९५- (५६.०५ टक्के), वारुळवाडी गट मतदान केंद्र - ३०९- (७६.२५ टक्के) ,३१०-(६३.९२ टक्के) , ३११- (६३.७४ टक्के),३१२- (५४. ३२ टक्के),३१३- (६१. ७२टक्के), ३१४- (७४.५२ टक्के),३१५- (७१.५५ टक्के), मांजरवाडी मतदान केंद्र - २ (१ - एकूण मतदान -११५३ पैकी झालेले मतदान ८०१- (६९. ६५ टक्के ) व (२- एकूण मतदान -९९२ पैकी झालेले मतदान ६११- ६१.६५ टक्के ),येडगाव इंदिरा नगर - झालेले मतदान ७०६ -(६९. ८३टक्के ),येडगाव गणेश नगर - झालेले मतदान ७५९ -(८१. ७८टक्के ),भोरवाडी येडगाव - झालेले मतदान ६३५ -(७२. ४०टक्के ),येडगाव नेहरकर वाडी - झालेले मतदान ५६० -(७१.७० टक्के ), हिवरे तर्फे नारायणगाव- झालेले मतदान २०२९ -(७३टक्के ), खोडद - झालेले मतदान २२४९ -(७४.टक्के).