पुणे : डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला उद्या (20 अाॅगस्ट) पाच वर्षे हाेत अाहेत. दाभाेलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी विचारांचा जागर करण्यात येणार अाहे. उद्या दिवसभर पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे विविध कार्यक्रम हाेणार असून यात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज अाणि दिग्दर्शक अमाेल पालेकर सुद्धा सहभागी हाेणार अाहेत.
20 अाॅगस्ट 2013 राेजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गाेळ्या घालून दाभाेलकरांचा खून करण्यात अाला हाेता. गेली पाच वर्षे या खुनाचा तपास संथ गतीने चालू असल्याचा अाराेप अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात येत हाेता. गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास सुरु हाेता. 14 अाॅगस्ट राेजी सी बी अायने दाभाेलकरांच्या खूनात सहभागी असल्याच्या अाराेपावरुन अाैरंगाबादमधून सचिन अंदुरे याला अटक केली हाेती. न्यायालयाने अाता त्याला सात दिवसांची सी बी अाय काेठडी सुनावली अाहे. सचिन अंदुरेचा दाभाेलकरांच्या खुनात सहभाग असल्याचा दावा सी बी अायने केला अाहे. परंतु दाभाेलकरांच्या खूनामागील खरा मास्टरमाईंड काेण अाहे याबाबत असून तपास व्हायचा अाहे.
दरम्यान उद्या सकाळी 7.15 वाजता विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डाॅ. दाभाेलकरांना जाेशपूर्ण गीतांमधून अभिवादन करण्यात येणार अाहे. त्यानंतर या पूलापासून ते साने गुरुजी स्मारकापर्यंत निषेध माेर्चा काढण्यात येणार अाहे. 11 वाजता व्यर्थ न हाे बलिदान हे चर्चा सत्र हाेणार असून यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभाेलकर अाणि तुषार गांधी सहभागी हाेणार अाहेत. 12.15 वाजता डाॅ. दाभाेलकरांच्या भ्रम अाणि निरास या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे लाेकार्पण केले जाणार अाहे. यावेळी प्रा. रावसाहेब कसबे यांची प्रमुख उपस्थिती असणार अाहे. त्यानंतर 2 वाजता अभिव्यक्ती के खतरे या विषयावर प्रकाश राज अाणि अमाेल पालेकर अापले विचार मांडणार अाहेत. 3.30 वाजता गांधींचं करायचं काय ? या एकअंकी नाटकाचे सादरिकरण केले जाणार अाहे. 4.30 ते 5 दरम्यान या कार्यक्रमाचा समाराेप अाणि निर्धार करण्यात येणार अाहे.