देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:39 AM2023-08-29T09:39:05+5:302023-08-29T09:39:35+5:30

काहीजण त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्याऐवढे काम करणारा नेता कोणीही नाही, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे

narendra modi is very good pm in india said ajit pawar | देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने

देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने

googlenewsNext

बारामती : केवळ विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन महायुतीसमवेत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अपमान करण्याची भुमिका नाही. देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. काहीजण त्यांच्यावर टीका करतात, त्यांनी मोदींएवढे काम करणारा नेता आहे का, याचा विचार करावा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली.

बारामतीकरांच्या वतीने पवार यांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी पवार बोलत होते.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, चांद्रयान मोहिमेच्या यशामुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आणली आहे. नरेंद्र मोदींच्या यांना ती तिसºया क्रमांकावर म्हणजे ५ ट्रीलीयन डॉलरवर घेऊन जायची आहे. त्यांच्याऐवढे काम करणारा नेता कोणीही नाही. एकनाथ शिंदे, फडवणवीस आणि आम्ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रीलीयन डॉलरवर नेणार आहोत. अर्थव्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी आपण महत्वाचे नियोजन करणार आहे. राज्यातील कृषि,उद्योग, आयटी क्षेत्रावर भर देण्याचे नियोजन आहे. वर्षभरातील प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी उत्तम काम केले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताने विकास मुद्रा उमटविली. त्याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. यापुर्वी आपण त्यांच्यावर विरोधात टीका केल्याचे मान्य करतो. मात्र,नंतरच्या काळात कसे काम होणार याबाबत आपल्यास माहिती नव्हते. बारामतीसह आसपासच्या सुरु असणाऱ्या महामार्गाच्या कामावरुनच आपल्याला केंद्र सरकारच्या कामाची कल्पना येते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांचा २० वर्षांंपासुन प्रलंबित असलेला ११ हजार ५०० कोटींचा प्रश्न मार्गी लावला.ती शेतकºयांवर कायम टांगती  तलवार होती,असे सांगत पवार यांनी शहा यांचे देखील कौतुक केले.

बारामतीकरांनो कोणाचा अपमान करण्याची भुमिका नाही. महायुतीबरोबर गेल्यानंतर आपण पुणे नगर नाशिक रेल्वेच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेट घेणार आहे. पुणे जिल्ह्यातील विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, पुणे शहरातील मेट्रोसह अन्य विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: narendra modi is very good pm in india said ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.