पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune tour) हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपने जंगी तयारी केली आहे. मोदींच्या स्वागतासाठी ऑस्टेलियन हिरा, सोने यांचा वापर करून फेटा तयार केला होता. त्या फेट्यावर राजमुद्राही होती. आता त्यावरील राजमुद्रा काढण्यात आली आहे. 'मी चांगल्या विचारानेच फेट्यावर राजमुद्रा लावली होती. पण काही इतिहास संशोधकांनी राजमुद्रेचा अपमान होत असल्याचा आक्षेप घेतल्याने फेट्यावरील राजमुद्रा हटवण्यात आली आहे, असे फेटा तयार करणाऱ्या गिरीष मुरूडकर यांनी सांगितले.
फेट्याची वैशिष्ट्ये -
- फेट्यासाठी कॉटन आणि सिल्क अशी दोन कपडे वापरण्यात आली आहेत- क्रीम आणि लाल रंगामध्ये फेटा तयार करण्यात आला आहे- फेट्याला ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहेत- फेट्याच्या पृष्ठभागावर जाळी बसवण्यात आली आहे. मोदींनी फेटा घातल्यावर त्यांना गरम होणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे.