पुणे : शाकाहार आणि अहिंसा भारतीय संस्कृती व परंपरेचा वारसा आहे, ही बाब लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांचा दि. ३० मे रोजी पंतप्रधानपदासाठीचा शपथ ग्रहण समारंभ होत आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळींसाठी जे शाही भोजन आयोजित केले जाईल, त्यामध्ये शुद्ध शाकाहारी पदार्थांचा समावेश असावा. या मागणीचे निवेदन या मागणीचे निवेदन शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल डॉ. गंगवाल यांनी ईमेलद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश अभिनंदनीय आहे. काही दिवसातच होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते, सन्माननीय व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे स्वत: शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे या शाही प्रीतीभोजनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जगभर शाकाहाराचा संदेश पोहोचावा, असे आवाहन डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केले. भारतातील विविध भागात अनेक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. विदेशातून येणा-या पाहुण्यांना आपल्या येथील स्वादिष्ट पदार्थांची चव चाखायला द्यायला हवी. महत्वाची बाब म्हणजे जर्मनी सरकारने सगळ्या शासकीय समारंभात शाकाहारी भोजन अनिवार्य केले आहे. त्यांच्या पर्यावरण मंत्री बार्बरा हैड्रिक्स यांनी फेब्रुवारी महिन्यात हा निर्णय घेतला. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण हानी याला मांसाहार कारणीभूत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शाकाहाराचा पुरस्कार करावा. तसेच आपल्या देशात असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर, मांस निर्यातीवर बंदी घालण्यात यावी याकडे त्यांनी लक्ष वेधले.----------------------------------------------------
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला प्रितीभोजन शाकाहारी ठेवावे : डॉ. कल्याण गंगवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 3:26 PM