लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीएमपी व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आल्याशिवाय निधी देणार नसल्याची भूमिका सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र, मंडळाच्या बैठकीतील मुंढे यांची कडक भूमिका पाहून पदाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका शुक्रवारी घेतली. ‘पीएमपी’चा विषय अजेंड्यावर असल्यास मुंढे अथवा त्यांचे सक्षम अधिकारी यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, मुंढे यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पालिकेकडून कोट्यवधी रुपये दिले जात असताना पीएमपीचा सक्षम अधिकारी बैठकीस आला पाहिजे. मुंढे यांच्याकडे वेळ अपुरा असल्यास इतर सक्षम अधिकारी पाठवावेत, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली.
तुकाराम मुंढे यांच्या हजेरीवरून नरमाई
By admin | Published: June 10, 2017 2:12 AM